नाशिक

शिंदे गावातील प्लास्टिक कंपनीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

लाखो रुपयांचे नुकसान; वर्षभरातील कंपनी आगीची तिसरी घटना

शिंदे, नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक तालुक्यातील शिंदे गाव परिसरातील औद्योगिक वसाहतीतील गट नं. 479 मधील एका प्लास्टिक कंपनीत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची पहाटे 4 वाजेच्या सुमारास घटना घडली. या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साहित्य, कच्चा माल व काही यंत्रसामग्रीसह चारचाकी मालवाहतूक आयसर (एम. एच.15 डी.के.9123)आगीत जळून खाक झाला असून, अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्लास्टिक कंपनीत अचानक पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग भडकली. प्लास्टिक दाना व साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आग वेगाने पसरली. घटनेची माहिती प्लास्टिक कंपनीचे मालक अमजत मुसा शेख (रा.इंदिरानगर, कॅनॉल, जेलरोड) यांना गूळ कंपनीचे मालक ज्ञानेश्वर रामचंद्र तुंगार (रा. शिंदे गाव, एमआयडीसी) यांनी दूरध्वनीवरून देताच शेख यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी नाशिकरोड अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तर घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि कर्मचार्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत प्लास्टिक व त्या लगत असणार्‍या गूळ कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेची पोलिस यंत्रणेला कळवूनदेखील दुपारी दोन वाजेपर्यंत कोणीही अधिकारी अथवा पोलीस कर्मचारी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी आलेले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तर आग कशामुळे लागली, या आगीचे नेमके कारण व नुकसानाचा तपशील जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू
केले आहे.

वर्षभरातील घटनांची या आगीने आठवण

शिंदे गावालगत असणार्‍या अनेक कंपन्यांचे उत्पन्न हे ग्रामपंचायतीकडे परवानगी न घेताच सुरू असून, काही कंपन्यांना उत्पादनासाठी अधिकृत परवानगी नसताना अनेक कंपन्या सुरू आहेत. तर काही कंपन्यांच्या प्रदूषणामुळे मळे विभागातील विहिरींना केमिकलयुक्त पाणी उतरते. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, यासंदर्भात प्रदूषण महामंडळाने संबंधित काही कंपनीधारकांना उत्पादन बंद करण्याचे लेखी पत्र दिले आहे. तरीही कोणाच्या मेहेरबानीने कंपन्या सुरू आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा आहे. काल लागलेल्या आगीने वर्षभरातील आगीच्या घटना पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

A major fire broke out at a plastic company in Shinde village due to a short circuit.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago