निफाड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

 

लासलगाव प्रतिनिधी

 

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना ओळखीचा फायदा घेत संधी साधून नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.युनुस अकबर शेख,रा टाकळी विंचुर असे संशयित नराधमाचे नाव असून लासलगाव पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

 

या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार

फिर्यादी पीडीत अल्पवयीन मुलगी हि घरी एकटी असतांना आरोपी युनुस अकबर शेख याने ओळखीचा फायदा घेवुन तिच्या घरात जावुन किचन मध्ये असतांना तिचा विनयभंग करून तु जर कोणाला काही सांगीतले तर तुझा वडीलांना मारुन टाकील अशी दमदाटी केली.त्या नंतर पुन्हा आठ दिवसांनी सदर आरोपीने फिर्यादीचे घरी येवुन फिर्यादी ही एकटी असतांना तीला बळजबरीने ओढुन या अल्पवयीन मुलीस लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले.

 

या प्रकरणी आरोपी युनुस अकबर शेख याच्या विरोधात भादवी कलम ३७६,३५४,५०६ अंतर्गत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपीस अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे,पोउनि एल.के. धोक्रट यांच्यासह पोलिस कर्मचारी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *