लासलगाव प्रतिनिधी
अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना ओळखीचा फायदा घेत संधी साधून नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.युनुस अकबर शेख,रा टाकळी विंचुर असे संशयित नराधमाचे नाव असून लासलगाव पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
फिर्यादी पीडीत अल्पवयीन मुलगी हि घरी एकटी असतांना आरोपी युनुस अकबर शेख याने ओळखीचा फायदा घेवुन तिच्या घरात जावुन किचन मध्ये असतांना तिचा विनयभंग करून तु जर कोणाला काही सांगीतले तर तुझा वडीलांना मारुन टाकील अशी दमदाटी केली.त्या नंतर पुन्हा आठ दिवसांनी सदर आरोपीने फिर्यादीचे घरी येवुन फिर्यादी ही एकटी असतांना तीला बळजबरीने ओढुन या अल्पवयीन मुलीस लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले.
या प्रकरणी आरोपी युनुस अकबर शेख याच्या विरोधात भादवी कलम ३७६,३५४,५०६ अंतर्गत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपीस अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे,पोउनि एल.के. धोक्रट यांच्यासह पोलिस कर्मचारी करत आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…