पंचवटी : वार्ताहर
दिंडोरी रोड , म्हसरूळ परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णावर उशीर का केला जात आहे अशी विचारणा करत टोळक्याने डॉक्टर पुत्रास मारहाण केल्याचा प्रकार घडला . याप्रकरणी डॉक्टरांच्या संघटनांनी म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांची भेट घेत संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली .
गेल्या ३५ वर्षांपासून पासून ,दिंडोरी रोड म्हसरूळ परिसरात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर अरुण विभांडिक यांच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दुपारच्या
सुमारास एक रुग्ण दाखल झाला होता . त्याच्या हाताला कापलेले होते . त्याच्या सोबत सात ते आठ टोळक्याने आले होते . दरम्यान यावचवेळी टोळक्याने वेळ का लागतो आहे म्हणून सर्वांना धारेवर धरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली . त्यावेळी व्यवस्थापनाचे काम करणारा डॉक्टरांचा मुलगा सौरभ विभांडीक आला .
डॉक्टर त्याने विचारणा केली असता त्याला तरुणांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू करून मारहाण केली . यात सौरभ बेशुद्ध होऊन त्याच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळतात शहरातील
डॉक्टर्स व विविध संघटनांचे पदाधिकारी, म्हसरूळ पोलिस स्टेशन येथे जमा होऊन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांची भेट घेऊन मारहाण करून रुग्णालयात धुडगूस घालणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन तर्फे देण्यात आले .