संपादकीय

रेल्वेच्या ‘महाप्लॅन’मधून उलगडणार नाशिकच्या विकासाचे नवे पर्व!

पाच स्थानकांचा कायापालट आणि ग्रामीण अर्थकारणाला ’बूस्टर डोस’

– वाहिद बागवान
कुंभमेळा म्हणजे केवळ श्रद्धेचा महासागर नाही, तर तो कोणत्याही शहराच्या पायाभूत सुविधा आणि अर्थकारणाला कैकपटीने पुढे नेणारा एक ’महायज्ञ’ असतो. 2027 च्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना, भारतीय रेल्वेने आखलेला 1250 कोटी रुपयांचा ’मेगाप्लॅन’ केवळ गर्दीचे व्यवस्थापन करणारा नाही, तर नाशिकच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र वेगाने फिरवणारा ठरणार आहे.
नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे देशभरातून आणि जगभरातून येणार्‍या कोट्यवधी भाविकांची मांदियाळी. 2027 मध्ये होणार्‍या या पर्वासाठी सुमारे 3 ते 4 कोटी भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. या अथांग जनसागराला सामावून घेणे आणि त्यांचा प्रवास सुखकर करणे हे मोठे शिवधनुष्य असते. हे ओळखूनच भारतीय रेल्वेने यंदा इतिहासातील सर्वात मोठे विकेंद्रीकरणाचे आणि आधुनिकीकरणाचे पाऊल उचलले आहे.
कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या मुख्य दिवसांमध्ये नाशिकरोड स्थानकावर पडणारा असह्य ताण कमी करण्यासाठी रेल्वेने यंदा अत्यंत रणनीतिक नियोजन केले आहे. या काळात दररोज दीडशे विशेष गाड्या चालवल्या जातील.
उत्तर भारतातून (दिल्ली, यूपी, बिहार) येणार्‍या 75 गाड्या थेट नाशिकरोडवर न आणता ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या स्थानकांवर थांबवल्या जातील. तर दक्षिण आणि पश्चिम भारतातून येणार्‍या 75 गाड्या देवळाली आणि नाशिकरोड स्थानकांपर्यंत येतील. यंदा प्रथमच गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंचलित प्रवासी नियंत्रण प्रणालीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
रेल्वेच्या या नियोजनामुळे ओढा, खेरवाडी, कसबे सुकेणे आणि देवळाली ही आता केवळ छोटी स्थानके राहणार नाहीत, तर ती नाशिकची ’सॅटेलाईट टर्मिनल्स’ बनणार आहेत. या स्थानकांवर अनेक अत्याधुनिक बदल होत आहेत:
विस्तारित प्लॅटफॉर्म्स व लूप लाईन्स: 24 डब्यांच्या गाड्या सहज थांबू शकतील अशी प्लॅटफॉर्मची लांबी.
भव्य होल्डिंग एरिया : एकाच वेळी 20-25 हजार भाविक सुरक्षितपणे थांबू शकतील असे प्रशस्त निवारे, जिथे पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतागृहे असतील.
अद्ययावत कनेक्टिव्हिटी: स्टेशनवरून थेट महामार्गांना जोडणारे रुंद रस्ते आणि नवे पादचारी पूल.
रेल्वेच्या या एका निर्णयामुळे केवळ प्रवाशांची सोय होणार नाही, तर ओढा,कसबे-सुकेणे आणि खेरवाडी परिसरातील अर्थव्यवस्थेत क्रांती घडणार आहे. हा फायदा नेमका कसा असेल, याचे हे 5 प्रमुख पैलू:
’होमस्टे’ आणि ग्रामीण आदरातिथ्य
नाशिकमधील पंचतारांकित हॉटेल्स आणि लॉजेस कुंभमेळ्यात परवडणारे नसतात. अशा वेळी स्टेशनच्या जवळ असणारी खेरवाडी, कसबे-सुकेणे, ओढा या गावांमध्ये ’होमस्टे’ची संकल्पना रुजेल. स्थानिकांना आपली घरे, रिकाम्या खोल्या किंवा शेतातील घरे भाड्याने देऊन थेट उत्पन्न मिळवता येईल. केरळ किंवा कोकणच्या धर्तीवर इथे ’व्हिलेज टुरिझम’ विकसित होऊ शकते.
सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी येतो आणि जातो. पण त्यानिमित्ताने होणारा विकास अनेक दशके टिकतो. या आधीच्या कुंभमेळ्याने नाशिकला महामार्ग आणि उड्डाणपूल दिले. 2027 चा कुंभमेळा नाशिकला ’अद्ययावत रेल्वे नेटवर्क आणि विकेंद्रित ग्रामीण अर्थव्यवस्था’ देऊन जाणार आहे. भारतीय रेल्वेचा हा ’महाप्लॅन’ यशस्वीपणे राबवला गेला, तर ओढा, खेरवाडी आणि कसबे-सुकेणे ही गावे केवळ कुंभमेळ्याची थांबे न राहता, उद्याच्या ’ग्रेटर नाशिक’चे अत्यंत महत्त्वाचे आर्थिक आणि दळणवळण केंद्र बनतील, यात शंका नाही!

शेतकरी ते ग्राहक : थेट बाजारपेठ
हा संपूर्ण पट्टा द्राक्ष, बेदाणे आणि भाजीपाल्यासाठी ओळखला जातो. मध्यस्थांशिवाय शेतीमाल थेट देशभरातून आलेल्या ग्राहकांना विकण्याची संधी शेतकर्‍यांना मिळेल. स्टेशनबाहेर उभे राहणारे कृषी-उत्पादनांचे स्टॉल्स इथल्या शेतकर्‍यांसाठी ’कॅश क्रॉप’ ठरू शकतात.

ट्रान्स्पोर्ट आणि लॉजिस्टिक्सची
मोठी झेप
हजारो भाविक ग्रामीण स्थानकांवर उतरल्यामुळे त्यांना रामकुंड किंवा त्र्यंबकेश्वरला नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गरज भासेल. यातून स्थानिक तरुणांसाठी ई-रिक्षा, खाजगी टॅक्सी, बस सेवा आणि पार्किंग व्यवस्थापनातून रोजगाराची प्रचंड मोठी साखळी उभी राहील.

सूक्ष्म आणि लघुउद्योगांची भरभराट
चहाची टपरी, वडापावची गाडी चालवणार्‍यांपासून ते स्थानिक हस्तकला, नाशिकचा चिवडा, पूजेचे साहित्य विकणार्‍या महिला बचत गटांपर्यंत सर्वांनाच एक हक्काची आणि मोठी बाजारपेठ स्टेशनच्या दारात उपलब्ध होईल.

रिअल इस्टेटचा सुवर्णकाळ
पायाभूत सुविधांचा विकास (रस्ते, वीज, रेल्वेचे आधुनिकीकरण) कायमस्वरूपी असल्याने या परिसरातील जमिनींचे आणि घरांचे भाव आतापासूनच वधारत आहेत. भविष्यात या भागात लॉजिस्टिक हब, वेअरहाऊसिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे राहतील.

A new era of development for Nashik to unfold through the Railways’ ‘Mega-Plan’!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago