नाशिक

हळदीत नाचताना धक्का लागल्याने एकावर कोयत्याने सपासप वार

पंचवटी : प्रतिनिधी
अमृतधाम परिसरातील विडी कामगारनगर येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचताना लागलेल्या धक्क्याचा राग मनात धरून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या हाताच्या तर्जनीचा काही भाग तुटला. आडगाव पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल सोमनाथ जगळे (वय 35, रा. विडी कामगारनगर) दि. 14 मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांचे मामेभाऊ तन्मय शिरसाठ यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी संशयित सिद्धांत ऊर्फ भुर्‍या वंजारी तेथे नाचत असताना त्याचा धक्का अमोल यांना लागला. जरा व्यवस्थित नाच, असे अमोल यांनी म्हटल्याचा राग सिद्धांतला आला. रागाच्या भरात सिद्धांतने त्याचे मित्र पीयूष खाडे, चिराग गजबे आणि नितीन मारकड यांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून अमोल यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
यावेळी नितीन मारकड याने अमोल यांना पाठीमागून पकडून ठेवले, तर सिद्धांतने कमरेचा कोयता काढून तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत थेट डोक्यावर वार केला.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अमोल यांनी हात वर केला असता कोयत्याचा वार त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर बसला. या हल्ल्यात त्यांच्या तर्जनीचा नखाखालचा भाग तुटून पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमोल यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुवर पुढील तपास करत आहेत.

A person was stabbed repeatedly with a sickle after being shocked while dancing in Haldi.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago