संशयिताला अटक; गुटख्यासह 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
देवळा : प्रतिनिधी
अपहरण, खंडणीची मागणी करून तालुक्यातील पिंपळगाव (वा) येथील एका व्यापार्याच्या मृत्यूस जबाबदार असणार्या, जबरी चोरी केलेल्या आरोपीकडून पिकअप गाडी व गुटख्यासह एकूण 28 लाख 16 हजार 64 रुपयांचा माल देवळा पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, देवळा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 12) चालक इलियास बागवान (वय 44, चांदवड) यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला होता. फिर्यादी व मृत जब्बार चांद तांबोळी पिकअप गाडीत (एमएच 15-एचएच 8861) गुटखा घेऊन येत असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांचे अपहरण करून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी 25 लाखांची खंडणी मागितली होती. त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडी व माल बळजबरीने घेऊन फरार झाले होते. जब्बार चांद तांबोळी यांचा झटापटीत मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान देवळा पोलिसांसमोर उभे ठाकले होते. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते तपास करीत होते. यातील संशयिताला ताब्यात घेतले असून, अटक केली आहे. संशयित महेश भामरे (रा. तांदूळवाडी, ता. बागलाण) याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी शिताफीने गुन्ह्यातील 22 लाख 16 हजार 64 रुपयांचा गुटखा व पिकअपसह 28 लाख 16 हजार 64 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेहेते, उपनिरीक्षक विनय देवरे, हवालदार नितीन बाराहाते, अंमलदार योगेश जामदार, दिलीप सोनवणे यांनीे कारवाई केली. वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत देवळा पोलीस ठाणे पथकाचे अभिनंदन केले आहे.
Deola police take action against extortionist
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच सुरक्षेची धाकधूक; 24 तास खडा पहारा त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर…
सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी सात दशकांची परंपरा…
नाशिक : श्री कालिका माता यात्रोत्सवात लहान-मोठ्यांचे आकर्षण ठरलेले रहाटपाळणे विद्युत रोषणाईमुळे असे विलोभनीय दिसतात.…
सोशल मीडियावर लहान मुलांचे देवीरूपातील फोटोशूट व्हायरल नाशिक : देवयानी सोनार सध्या सोशल मीडियावर एक…
‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा…
मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा…