नाशिक

नाशिकरोडला शिवभक्तांचा उसळला जनसागर

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जय शिवराय’, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय’ या गगनभेदी घोषणांनी नाशिकरोड परिसर दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड व जेलरोड विभागात उत्साहात आणि भक्तिभावात शिवजयंती साजरी करण्यात आली. लाडक्या राजाच्या दर्शनासाठी शिवभक्तांचा जनसागर उसळला होता.
शिवजन्मोत्सव समिती, नाशिकरोड व जेलरोड विभागाच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. दोन्ही ठिकाणी आकर्षक देखावे उभारण्यात आले होते. स्वागत कमानी, भगवे पताके व विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण नाशिकरोड परिसर भगवेमय झाला होता. बुधवारी मध्यरात्री अनेक शिवभक्तांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपस्थित अधिकार्‍यांसह महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन
अभिवादन केले.
गुरुवारी (दि. 19) सकाळपासून विविध भागांतून बाइक रॅली, चित्ररथ व मिरवणुका छत्रपती चौकात दाखल होत होत्या. अनेक ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त अनेक शिवभक्तांच्या घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर दुचाकी व चारचाकी वाहनांवर भगवे झेंडे फडकताना दिसत होते. समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वीर सावरकर उड्डाणपुलाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग नोंदविला. अन्नछत्राचे आयोजनही करण्यात आले होते. सायंकाळी सिन्नरफाटा, जेलरोड, देवळाली गाव, उपनगर आदी भागांतून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये शिवभक्तांसह तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. समितीचे अध्यक्ष दर्शन सोनवणे, कार्याध्यक्ष मिलिंद माळवे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपायुक्तकिशोर काळे, सहा. पोलिस आयुक्त संगीता निकम, डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व जयंत सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यामध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती जेलरोड, शिवजन्मोत्सव सोहळा समिती चेहडी गाव, नालंदा रिक्षा स्टॅण्ड मंडळ, संग्राम मित्रमंडळ (सिन्नर फाटा), शिवा भागवत फ्रेंड सर्कल, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती शिंदे गाव, शिवजन्मोत्सव सोहळा समिती पळसे, तरुण महाराष्ट्र मित्रमंडळ, राजराजेश्वरी चौक फ्रेंड सर्कल, राजे ग्रुप सौभाग्यनगर, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती मोहगाव, पेंढारकर कॉलनी मित्रमंडळ, शिवरत्न मित्रमंडळ, शिवजन्मोत्सव पालखी मिरवणूक (रोकडोबावाडी), शिवजन्मोत्सव सोहळा समिती विहितगाव आदी मंडळांचा सहभाग होता. तसेच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवजन्मोत्सव समिती विहितगाव, राजधानी क्रीडा व कला सांस्कृतिक मंडळ आनंदनगर, आगर टाकळी मित्रमंडळ, शिवरत्न मित्रमंडळ, पेंढारकर कॉलनी मित्रमंडळ, शनैश्वर मित्रमंडळ देवळालीगाव, शिवांश फाउंडेशन, लोकराज्य फाउंडेशन व व्यापारी मित्रमंडळ, कैलासजी मित्रमंडळ जेलरोड आदी मंडळांनी सहभाग नोंदविला.

38 मंडळांची नोंद

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 अशी एकूण 38 मंडळांची नोंद करण्यात आली होती. दिवसभरात सुमारे 28 मिरवणूक मंडळांनी सहभाग घेतला.

A sea of ​​Shiva devotees surged on Nashik Road.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…

3 hours ago

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

9 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

9 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

9 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

9 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

9 hours ago