वाटसरू ठार; मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू
इगतपुरी : प्रतिनिधी
घोटी शहरात शुक्रवारी (दि. 4) सकाळी सुमारे साठ वर्षांंपूर्वीचे जुने झाड कोसळले. या झाडाखाली वाटसरू दबल्याने तो ठार झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. शहरातील जुन्या आग्रा रोडवर ही घटना घडल्याने या मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू राहिल्याने वाहतूक कोंडी होत होती.
घोटी शहर हे बाजारपेठेचे प्रमुख केंद्र असल्याने बाजारपेठेत सातत्याने वर्दळ असते. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घोटी येथे झाड कोसळल्याने रस्त्याने जाणारे नागरिक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. यावेळी रस्त्याच्या बाजूने जाणारा कामगार झाडाखाली दबल्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बर्याच प्रयत्नानंतर त्या व्यक्तीस बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, स्थानिक रुग्णवाहिकाचालक तुकाराम चव्हाण यांनी तत्काळ त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच ही व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. सायंकाळपर्यत या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती.
घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतुकीबाबत सूचना दिल्या. ग्रामपालिकेच्या कर्मचार्यांनी हे झाड रस्त्यावरून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…