नाशिक

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व शिंदेसेनेत उबाठातील माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली आहे. त्यातूनच ही निवडणूक महायुतीमधील हे दोन्ही प्रमुख पक्ष स्वबळावरच लढविणार असल्याचे चित्र आहे. त्याद़ृष्टीनेच विरोधी पक्षांतील नेत्यांची मेगाभरती भाजप व शिंदेसेनेत सुरू आहे. दरम्यान, दुसरीकडे नाशिक महापालिकेसाठी शिंदेसेना व वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची चर्चा आहे. दरम्यान, यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने भाजप वगळता शिंदेसेना, ठाकरे गट, काँग्रेस या पक्षांसोबत युती होण्याचे संकेत दिले आहेत. वंचित आघाडी सोबत यावी, अशी इच्छा शिंदेसेनेची असल्याचे बोलले जाते. मात्र, वंचित कोणासोबत जाणार याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजप-शिंदेसेनेत अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. भाजपला जशाच तसे उत्तर देण्यासाठी शिंदेसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे व इतर महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकीत शिंदेसेनेसोबत आल्यास त्याचा फायदाच होईल. यासाठी शिंदे गटाचे वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न असल्याची चर्चा आहे. या दोन्ही पक्षांची नाशिक महापालिकेसाठी युती झाली तर त्याचा फायदा कसा होईल, हे निकालातूनच
समजेल.
नाशिक महापालिका हद्दीत काही प्रभागांत वंचित आघाडीला मानणारा वर्ग आहे. त्यातच यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या पन्नास हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे भाजपने शंभर प्लससाठी शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांना पक्षात घेऊन त्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रभागाची व्याप्ती मोठी असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. अशा वेळी वंचितशी युती शिंदेसेनेला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीला शिंदेसेनेसोबतच महाविकास आघाडीतील पक्षांसोबत जाण्याचा पर्याय आहे. वंचितची स्थापना 2019 साली झाल्याने प्रथमच महापालिका निवडणुकीला पक्ष सामोरे
जात आहे.
शिंदेसेना व वंचित आघाडीची युती होणार की, वंचित दुसरा पर्याय स्वीकारणार, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे. मात्र, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे याकडे लक्ष
लागले आहे.

महापालिका निवडणुकीबाबतचे अधिकार पक्षाने स्थानिक पदाधिकार्‍यांना दिले आहेत. निवडणुकीच्या द़ृष्टीने शिवसेना ठाकरे गट व मनसेसमवेत प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, निवडणूक कोणासोबत लढवायची, हे श्रद्धेय अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हेच ठरवणार असून, ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
– डॉ. अविनाश शिंदे, महानगरप्रमुख, वंचित बहुजन आघाडी

शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक महायुतीने एकत्र लढवली. त्यात महायुतीला प्रचंड यश मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आम्ही महायुती म्हणून लढविणार आहोत. मात्र, कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचे व युती करायची याबाबत मुख्य नेते श्री. शिंदे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल.
– अजय बोरस्ते, उपनेते, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना

Editorial Team

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

48 seconds ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago