पहिल्या दिवशी एकही कॉपी प्रकरण नाही
नाशिक ः प्रतिनिधी
आयुष्याला कलाटणी देणार्या दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंकाकुशंकाचे काहूर माजलेले असते. इतर परीक्षांपेक्षा या परीक्षेला महत्त्व असल्याने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन हवे असलेले करिअर निवडीसाठी दहावी बोर्डाची परीक्षा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे दहावी बोर्डाची परीक्षा ही विद्यार्थ्यांसह पालकांचीही परीक्षाच असते.
शुक्रवारी (दि.20) दहावी बोर्डाचा पहिला भाषा पेपर होता. यावेळी पालकांसह विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये सुरू असलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेअंतर्गत 20 रोजी सकाळ सत्रात नाशिक विभागातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये कोणताही गैरप्रकार नोंदविण्यात आलेला नाही.
सामुदायिक कॉपी, परीक्षा केंद्रावरील तोतयागिरी, कॉपी प्रकरणे, शिक्षकांनी सहाय्य केलेली प्रकरणे अथवा इतर कोणत्याही स्वरूपाचे गैरप्रकार शून्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण प्रकरणेही सर्व जिल्ह्यांमध्ये निरंक आहेत.
मंडळाने राबविलेल्या काटेकोर पर्यवेक्षण, केंद्रस्तरीय शिस्त आणि दक्षतेमुळे परीक्षा सुरळीत व पारदर्शकपणे पार पडत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.
A smooth start to the 10th standard exams
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…
दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…