नाशिक

विचारांचे व्दंव्द मांडणारे चेटुकवार

 

 

विचारांचे व्दंव्द मांडणारे चेटुकवार

नाशिक : प्रतिनिधी

 

61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत  रविवारी (दि.27)रोजी चेटुकवार या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.प्रत्येक माणसाच्या मनात असणाऱ्या चांगल्या आणि वाईट विचारांमध्ये कायमच व्दंव्द सुरु असते. त्यावेळी जो विचार त्या व्यक्तीचा ताबा घेतो, त्यानुसार तो व्यक्ती वागतो.चांगल्या आणि वाईट विचारांचे तरंग प्रत्येकाच्याच मनात उसळ्या मारत असतात. जेव्हा माणसाच्या मनाचा ताबा वाईट विचार घेतात, तेव्हा तो वाट्टेल ती दुष्कृत्ये करतो. अनेकदा स्वार्थाने आंधळा होऊन अगदी हीन पातळीवर जाऊन कृष्णकृत्य करतो. सोळाव्या शतकात शेक्सपिअरला दिसलेल्या माणसांसारखीच माणसे एकविसाव्या शतकातही आहेत. माणसाच्या मनातील विचारांची आंदोलनं, त्याची स्वप्न, त्याच्यावर आलेले चांगले-वाईट प्रसंग यातून माणसं कल्पनेतील एक जग निर्माण करतात. त्याबाबत एका राजाच्या कथेतून सारं काही गुंफत वास्तव मांडण्यात आले.

विल्यम शेक्सपिअरच्या द टेम्पेस्ट या नाटकाचे प्रा. दिलीप जगताप भाषांतर करत  ‘चेटुकवारं’ हे लिहले .नाटकाचे दिग्दर्शन  राजेश टाकेकर यांनी केले.नाटकात निर्मिती प्रमुख म्हणून रवींद्र ढवळे, नंदकुमार देशपांडे, नेपथ्य चंद्रकांत जाडकर, संगीत विक्रम गवांदे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा हरीकृष्ण डिडवाणी आणि प्रकाशयोजनेची  विनोद राठोड यांनी केले. नाटकात जय शुक्ल , डॉ. सोनाली गायकवाड, वैष्णवी ताम्हणकर ,ऋषिकेश शेटे, रवींद्र ढवळे ,विवेकानंद भट, अरूण भावसार ,प्रबुद्ध मागाडे ,सचिन दलाल, लक्ष्मीकांत पवार, हरिकृष्ण डिडवाणी , ओम शेवाळे ,हरीश परदेशी, मुरलीधर जगताप , संजय साळवे, केदार रत्नपारखी, राजेश टाकेकर यांनी अभिनय केला.

 

 

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago