सातपूर: प्रतिनिधी
सातपूर भाजी बाजार येथे झाड तोडण्यासाठी मशीन साठी एका प्लास्टिक कॅन मध्ये पेट्रोल आणले असता बिडीची ठिणगी उडाल्याने स्फोट होऊन सहा ते सात जण भाजल्याची घटना आज दुपारी सातपूर भाजी मंडई भागात घडली
पेट्रोल डिझेल एका कॅन मध्ये आणले होते, त्यामधील काही मशीन मध्ये भरताना खाली सांडले, त्या ठिकाणी शेजारी एक जण बिडी पीत होता, त्याच्याकडून माचीसची काडी किंवा बिडी खाली पडली, त्याच्यामुळे कॅन चा स्फोट झाला व सात जण भाजले गेले आहेत.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.