आडगाव शिवारात भीषण अपघात चार जण जागीच ठार
सिडको: दिलीपराज सोनार
नाशिक मुंबई महामार्गावरील आडगाव येथे आयशर ट्रक आणि मारुती ब्रिझा या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात नाशिकच्या सिडको परिसरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय, आयशर चालक विरुद्ध दिशेने येत असताना समोरून जाणाऱ्या ब्रिझा कारने आयशरला समोरून धडक दिल्याने हा अपघात घडलाय या अपघातात गाडीतील मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडून होते तर मारुती ब्रीजा गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, अपघाताची दृश्य मन हेलावून टाकणारी आहे
याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक मुंबई महामार्गावर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयशर ट्रक हा विरुद्ध दिशेने म्हणजे समोरुन येत असतांना आणि मारुती ब्रीजा क्रमांक एम एच ०५ डि एच ९३६७ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात नाशिकच्या सिडको आणि इंदिरानगर परिसरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.यात या अपघातात इंदिरानगर येथे रहाणारे सज्जु शेख आणि अक्षय जाधव तर लेखा नगर परिसरात रहाणारे अरबाज तांबोळी रहेमान तांबोळी या चार जणांचा मृत्यू झाले आहेत अपघात इतका भीषण होता की याल दोन गाड्यामध्ये झालेल्या धडकेचा आवाज आजुबाजुच्या घरांपर्यत पोहचला होता यामुळे परिसरातील नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती,
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे आहे आयशर ट्रक आणि मारुती ब्रीजा या दोन वाहनांमध्ये भीषण झालेल्या भीषण अपघातात दोनही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.याप्रकरणी आडगांव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास आडगांव पोलिस करीत आहेत
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक…
डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…
राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…
नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…
इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…