महापालिकेच्या अंगणवाडीतील बालकांना खेळातून शिक्षण
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या अंगणवाडीतील बालकांचा सवार्ंगीण विकास घडवून आणण्यासाठी महापालिका तब्बल 85 लाख 78 हजार 500 रपयांचा खर्च करून जादुई पिटारा साहित्याची खरेदी करणार आहे. खेळातून शिक्षणावर भर याद्वारे बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने मनपाच्या सहा विभागांतील 301 अंगणवाड्यांतील दहा हजार 620 बालकांना जादुई पिटारा खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवला आहे.
विद्यार्थ्यांना अक्षर व अंकओळख सहज व सोप्या पद्धतीने व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अंगणवाड्यांंमध्ये जादुई पिटारा संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धमर्ेंद्र प्रधान यांनी 2023 मध्ये या उपक्रमाचे उदघाटन केले होते. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नाशिक महापालिकेनेदेखील आता जादुई पिटार्याचा अंगणवाड्यांत अंमल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तीनशे अंगणवाड्यांंमध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वाचता येत नाही, त्यामुळे त्यांना कुठलेच ज्ञान मिळत नाही. पायाभूत, संख्याज्ञान आणि भाषाज्ञान शिकविण्यासाठी त्याच्याशी निगडित छोट्या-मोठ्या साहित्याद्वारे शिक्षण देण्यासाठी जादुई पिटारा ही संकल्पना केंद्र सरकारने आणली. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर जादुई पिटारा सर्व अंगणवाड्यांतील बालकांसाठी उपलब्ध होईल. या पिटार्याचा वापर अंगणवाड्यांतील 3 ते 8 वर्षे वयोगटातील बालकार्ंंना करता येणार आहे. या जादुई पिटारात वाचन व लेखन साहित्याशी निगडित साहित्य असेल. त्यात कोडी, पुस्तके, पोस्टर्स, फ्लॅशकार्ड, वर्कशीट, त्रिकोण, चौकोन स्वरूपातील खेळणी हे साहित्य असेल.
A whopping ₹85 lakh spent on the ‘Magic Chest’