सिन्नर ः प्रतिनिधी
सिन्नर बायपासवरील डुबेरे पुलाजवळ गुरुवारी (दि. 8) सकाळी अनियंत्रित झालेल्या मालवाहू ट्रकने पुढे चाललेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक रस्त्यावर उलटला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रामदास रामकृष्ण पोटे (52) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेले त्यांचे मित्र प्रकाश साबळे (55) गंभीर जखमी झाले.
रामदास पोटे व प्रकाश साबळे हे खिरविरे (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील रहिवासी असून, सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. बुधवारी रात्री नाईट शिफ्ट आटोपून गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ते दुचाकी (क्र. एमएच -05, एएच -9033)वरून बायपासने खिरविरेकडे जात होते.
डुबेरे पुलाजवळ नाशिककडून पुण्याच्या दिशेने येणार्या अशोक लेलँड कंपनीच्या मालवाहू ट्रकने (क्र. जीजे 18, बीटी- 3144) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. अपघातात रामदास पोटे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश साबळे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मृताचा भाऊ पंढरीनाथ रामकृष्ण पोटे (45) यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक हेमंत तांबडे करीत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर काही काळ सिन्नर बायपासवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सातत्याने घडणार्या अपघातांमुळे बायपासवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
A worker was killed when an uncontrolled cargo truck hit a two-wheeler
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…