मनपा शाळेची सुरक्षा वाऱ्यावर-सुरक्षा वाऱ्यावर; संशयित अटकेत
सातपूर: .सिध्दार्थ लोखंडे
-श्रमिकनगर कार्बन नाका येथील मनपाच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात ९वीच्या विद्यार्थिनींसमोर वर्गाबाहेरून एका इसमाने शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान अश्लील कृत्य करत छेडछाडीचा प्रकार घडला
युवकाच्या या घानरड्या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी तत्काळ शिक्षकांकडे जाऊन तक्रार केली. संशयितास शालेय आवारात अश्लील कृत्य करत असताना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संतोष इंगळे असे या संशयिताचे नाव असून, तो अशोकनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. या प्रकारामुळे शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नेमका हा इसम शाळेच्या परिसरात घुसला कसा त्यावेळी शाळेचे सुरक्षारक्षक होते कुठे याचा देखील तपास लावण्याची मागणी नागरिक करीत आहे.पाच एकर शाळेच्या परिसरात अवघे दोनच सुरक्षारक्षक आहे. त्यामुळे शाळेत सुरक्षारक्षक व पूर्ण क्षमतेने शिक्षकांची नियुक्ती करावी. तसेच अशा टवाळखोरांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…