उत्तर महाराष्ट्र

देवा तुझ्याचसाठी उघडून द्वार!

गणेशोत्सवासाठी भक्तांची, मंडळांची लगबग
नाशिक ः देवयानी सोनार
महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळे तसेच भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तयारीची लगबग सुरू झाली आहे. देखावे,रोषणाई,सजावट,वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असल्याने त्याच्या नियोजनास सुरूवात झाली असल्याचे शहरातील विविध गणेशमंडळातील पदाधिकार्‍यांनी सांगितले.त्यामुळे यंदा उत्सवास रंगत येणार असल्याचे चित्र आहे.
कोरोनातील दोन वर्षाच्या संकटानंतर निर्बधमुक्त वातावरणात गणेशोत्सव होणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण उत्सवांवरील निर्बध,अटी शर्ती हटविल्याने यंदाचा गणेशोत्सव आणि इतर सण धुमधडाक्यात साजरे होणार असल्याने त्यामुळे शहर,उपनगरातील छोटी मोठी मंडळांची लगबग सुरू झाली आहे.मंडळातील गणपती पासून ते सजावट,रंगरंगोटी,देखावे यासाठी तयारी सुरू झाली आहे.
कोरोना काळात सण उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या.त्यामुळे जल्लेाशात उत्सव साजरे न होता घरगुती,साध्या पदध्यतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मिरवणूका,विसर्जन,देखावे,विद्युत रोषणाई,वाद्यांचा आवाज बंदच राहीला होता.
शहरातील रविवार कारंजा,भद्रकाली गणेश मंडळ, गुलालवाडी गणेशोत्सव मंडळ,नाशिकचा राजा,सह विविध छोट्या मोठ्या गणेशमंडळांची लगबग सुरू झाली आहे.गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला असून तब्बल महिनाभराचा वेळ असल्याने नियोजनासाठी वेळ मिळणार आहे.त्यामुळे विविध लायटिंग,सजावटीचे साहित्य,साऊंड सिस्टीम,देखावे याबरोबर सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. उंची आणि पीओपीच्या गणेश मूर्तींवरील निर्बंध उठविले किंवा नाही याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. आहे.त्यामुळे पीओपीबाबत निर्णय वर्षभर आधी जाहीर करण्यात यावा, असे मूर्तीकारागिरांचे म्हणणे आहे.

कोरोना काळातील दोन वर्षांनंतर यावेळी निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्यामुळे जल्लोषातच होणार आहे. त्याप्रमाणे तयारी सुरू झाली आहे. आगमन व विसर्जन मिरवणूक सुद्धा जल्लोषात होणार आहे. याशिवाय गणेशोत्सव काळात मेडिकल कॅम्प व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. महिनाभराचा अवधी असल्याने डेकोरेशन, लाईटींग, मंडप वगैरे ठरविणे गणेशोत्सव काळातील कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे.कार्यकर्ते वर जबाबदारी सोपवण्यात येत आहे

पोपटराव नागपुरे
रविवार कारंजा मित्र मंडळ

 गणपती यंदा निर्बंधमुक्त साजरे होत आहे, तथापि,
फक्त उंचीवरचे निर्बंध उठवले आहेत. नागरिकांनी निट न ऐकता पीओपी परवानगी दिली असा समज करुन घेतला आहे. परंतु याबाबत आज न्यायालय सांगेल. पीओपीला परवानगी म्हणजे कंटेंट ऑफ कोर्ट होईल. परत विसर्जनाचाही मुद्दा आहे नैसर्गिक जल स्त्रोतात विसर्जनास बंदी आहे. सध्या कोर्टाने राज्य सरकारला पीओपी बंदीचे समान धोरण ठरविण्याचे आदेश दिले आहेत.


संतोष शहरकर
पारंपारिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ
अध्यक्ष : नाशिक जिल्हा

 

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago