आगीमुळे वन्यजीवांना धोका 

निफाड: प्रतिनिधी
जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात सोमवारी वणवा पेटल्याची घटना घडली. या आगीमुळे हजारो पक्ष्यांच्या अधिवास व जैवविविधता धोक्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणावर स्थित असलेल्या तसेच महाराष्ट्राचे भरतपूर असलेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य येथे दरवर्षी देश-विदेशातून हजारो पक्षी डेरेदाखल होतात. या पक्ष्यांना बघण्यासाठी देशभरातील पक्षिमत्र येतात. अभयारण्य क्षेत्रात चापडगाव येथील पक्षी निरीक्षणाच्या शेवटच्या टॉवरजवळ गोदावरी काठावर वणवा भडकला. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे

One thought on “ आगीमुळे वन्यजीवांना धोका 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *