नवी दिल्ली, आमदार अपात्रते संदर्भात दाखल केलेल्या याचिकेबाबत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले
उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे, बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र करावे अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे, या याचिकेवर आज सुनावणी होणार होती, मात्र सुप्रीम कोर्टाने आज परिस्थिती जैसे थे ठेवावी, जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत आमदारांवर कारवाई करू नये, असे कोर्टाने म्हटले आहे, यामुळे बंडखोर16 आमदारांना दिलासा मिळाला आहे,
या आमदारांच्या आपत्रतेमुळे प्रलंबित याचिकेमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे, हे प्रकरण घटनापीठाकडे देण्यात येणार असल्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत,