आर्टपार्कद्वारे ‘कोडेव्हर 2021’चे आयोजन

मुंबई :
बंगळुरूस्थित ना-नफा संस्था असलेली एआय आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क (आर्टपार्क)ने मार्च 2022 मध्ये स्टेमपेडियाकडून ऊर्जाप्राप्त कोडेव्हर 2021च्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन केले होते. त्याचे आयोजन 7 ते 18 वर्षे वयाच्या मुलांना नावीन्यपूर्ण एआय प्रकल्प तयार करण्यासाठी आणि आपल्या उत्तम एआय व कोडिंग कौशल्यांद्वारे जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी करण्यात आले होते. या
स्पर्धेचा हेतू साधकबाधक विचार करणे, कलात्मकता, समन्वय आणि संवाद या गोष्टींना म्हणजे 21 व्या शतकातील कौशल्यांना प्रात्यक्षिक प्रकल्प उभारणी दृष्टीकोनाद्वारे चालना देण्याचा आहे. आर्टपार्कच्या व्यापक उद्दिष्टाचा फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवर उत्तम एआय आणि रोबोटिक्स समुदायाच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्याचा हेतू आहे. या स्पर्धेत 68 देशांमधील एकूण 69525 विद्यार्थ्यांच्या टीम्स सहभागी झाल्या. त्यात वैयक्तिक आणि दोन विद्यार्थ्यांचे समूह तीन वयांच्या वर्गवारीत होतेः प्राथमिक (7 ते 10 वर्षे), ज्युनियर (11 ते 14 वर्षे) आणि सीनियर (15-18 वर्षे). या आवृत्तीच्या संकल्पना आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण करणे, परिसराचे ऑटोमेशन, स्मार्ट वाहतूक यंत्रणा, जगाचे मनोरंजन करणे, पर्यावरणाचे संवर्धन आणि बाह्य जगाचा शोध अशा विविध गोष्टी आहेत.
आर्टपार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक श्री. उमाकांत सोनी म्हणाले की, शिकण्यास शिकणे आणि निर्मिती शिकणे या दोन गोष्टी भविष्यासाठी खूप महत्त्वाची कौशल्ये ठरणार आहेत. त्यांची आगामी एआय प्रेरित अनुभव अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि ती ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेला पूरक ठरेल. कोडेव्हर हा या दोन महत्त्वाच्या गोष्टी आमच्या मुलांमध्ये बिंबवण्याच्या दृष्टीने केलेला एक प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना या एआयच्या युगात फक्त तग धरणे नाही तर विजयी होण्यास मदत होईल. आम्हाला जगभरातील विद्यार्थ्यांकडून मिळालेला हा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला आहे. आम्हाला या मुलांकडून मिळालेले प्रकल्प पाहता प्रत्येक मूल वेगळे आहे आणि काहीतरी नवीन करून जगात मोठे बदल घडवून आणण्याची त्याच्यात क्षमता आहे हा आमचा विश्वास पुनरूज्जीवित होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *