नाशिक

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक

मालेगाव : नीलेश शिंपी
शहरातील संगमेश्वर येथील वर्ग दोनची जमीन तत्कालीन प्रांताधिकारी उदय किसवे यांनी पदाचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने वर्ग एकची केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात केली.
त्याचबरोबर तुकडाबंदी असताना 2013 ते 2019 या काळात 272 तुकडे केल्यामुळे तत्कालीन आठ मुद्रांक अधिकार्‍यांची प्राथमिक चौकशी व याच प्रकरणात शहरातील दोन स्टॅम्प वेंडरांसह त्यांना मदत करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचेही त्यांनी विधिमंडळात सांगितल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. तुकडेबंदी कायदा असताना जमिनीचे 16 तुकडे करून ती जमीन खरेदीखतात बैलगोठ्याकरिता खरेदी केलेली आहे का? त्या प्रकरणात उपनिबंधकांवर काय कारवाई करणार? मालेगावचे तत्कालीन प्रांताधिकारी यांनी संगमेश्वर येथील वर्ग दोनची जमीन एकची केली आहे. त्यांचा निर्णय अपर जिल्हाधिकारी यांनी 16 जुलै 2014 ला रद्द केला आहे. त्यामुळे तत्कालीन प्रांताधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार? ग्रीन झोनची जमीन असताना त्या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम केलेले आहे, ते निर्गमित करणार का? तसेच रहिवासी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील स्टॅम्प वेंडर जाकीर व आरिफ अब्दुल लतिफ यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विधान परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित
केला होता.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, 2002 च्या परिपत्रकाप्रमाणे भूखंड किंवा जमिनीची अदलाबदली करायची असेल तर सलग असावी लागते. असे असतानादेखील तत्कालीन प्रांताधिकारी किसवे यांनी शहरातील संगमेश्वर येथील गट नंबर 114 अ व गुगळवाड येथील गट नंबर 253 या दोन गटांची अदलाबदल केली. शासनाच्या परिपत्रकानुसार ती न करता पदाचा गैरवापर करून अदलाबदल केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची घोषणा मंत्री बावनकुळे यांनी केली.
तसेच त्यांची प्राथमिक व नंतर विभागीय चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई
करण्यात येईल.

अनधिकृत दस्त नोंदणीची चौकशी होणार
राज्यात तुकडाबंदी कायदा असतानादेखील 2013 ते 2019 मध्ये संगमेश्वरातील जमिनीचे 272 तुकडे करत 258 दस्त नोंदणी करण्यात आले. हे चुकीचे आहे. या सहा वर्षांच्या काळातील मुद्रांक अधिकारी भुरके, गावित, कापडणे, गुप्ते, हिरे, कळस्कर, मोतीराळे, वाणी या अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत दस्त नोंदवले आहेत. या अधिकार्‍यांनी कुठले कुठले दस्त चुकीचे नोंदविले आहे. त्यांची प्राथमिक चौकशी केली जाईल. अधिवेशन संपण्याच्या आत प्राथमिक चौकशी करून काय कारवाई केली हे सभागृहाला सांगेन, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल. या प्रकरणात स्टॅम्प वेंडर जाकीर व आरिफ अब्दुल लतिफ यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले आहेत. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

 

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

4 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

4 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

4 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

5 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

5 hours ago

मनमाड शहरात वाहतूक कोंडी; गाडी बंद, रस्ता बंद

वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा! मनमाड : प्रतिनिधी दुष्काळी अन् पाणीटंचाई…

5 hours ago