उपनगरचा सहाय्यक निरीक्षक जाळयात
गुन्हे तपासासाठी मागितली सात हजारांची लाच
नाशिकरोड: प्रतिनिधी
तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपास करण्यासाठी पुणे येथे जाण्यासाठी लागणाऱ्या खाजगी वाहनाचा व जेवणाच्या खर्चासाठी , तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी करून 7 हजार रुपये लाचेची रक्कम
स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक
सागर गंगाराम डगळे उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांना
रंगेहात पकडण्यात आले आहे. विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, .पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे,
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पो. ना. किरण अहिरराव, पो. ना.अजय गरुड पो.ना. चंद्रशेखर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.