एक लाखांची लाच मागितल्याने निफाडच्या सहकार अधिकाऱ्यावर गुन्हा

नाशिक : प्रतिनिधी
निफाड येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यास तब्बल एक लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली.
तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी निफाड येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी राजेश शंकर ढवळे यांनी दीड लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागीतली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी पडताळणी केल्यानंतर लाच मागीतल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा  वालावलकर- घारगे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस नाईक दीपक पवार, संजय ठाकरे, अविनाश पवार यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.
Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago