सिन्नरचे माजी पालिका मुख्याधिकारी लाच लूचपतच्या जाळ्यात
सिन्नर: प्रतिनिधी
नगरपरिषदेचे मावळते मुख्याधिकारी संजय केदार लाचलुचपतच्या ताब्यात. तक्रारदाराची बांधकाम मंजुरीची फाईल ६ महिन्यांपासून अडवून ठेवली होती. त्यापोटी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात तीन-चार दिवसांपासून मोबाईलवर सुरू असलेले संभाषण पुरावा म्हणून ग्राह्य धरत केदार यांना दुपारी साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आले आहे. त्यासोबतच शिवाजीनगर मधील त्यांच्या निवासस्थानाचीही तपासणी करण्यात येत आहे.