येवला पंचायत समितीचा कर्मचारी लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
शिक्षक दाम्पत्याचे अंतिम वेतन देयक तयार करुन देण्याच्या मोबदल्यात दोन हजारांची लाच स्वीकारताना येवला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक संजय पाटील यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे शिक्षक असून, त्यांचे वेतन देयक तयार करण्यासाठी संजय पाटील याने दोन हजारांची लाच मागीतली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला असता येवला पोस्ट ऑफिससमोर दोन हजार स्वीकारताना पाटील यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना भोये, हवालदार चंद्रशेखर मोरे, दीपक पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…