महाराष्ट्र

– नवी मालिका – ‘तुजं माजं सपान’.

तुजं माजं सपान’ या मालिकेतून कुस्तीपटूंची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला.
१९ जूनपासून, सोम. ते शनि. संध्या. ७ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.
                     
सोनी मराठी वाहिनी कायमच निरनिराळे विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘तुजं माजं सपान’ ही दैनंदिन मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये दोघेही आपल्याला कुस्ती करताना दिसताहेत.
प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत प्राजक्ता आणि वीरेंद्र यांच्या प्रेमाचे तुफान कसे येणार, हे पाहायला मिळेल. मालिकेत दोघेही कुस्तीपटू दाखवले आहेत आणि एखाद्या मालिकेत कुस्तीपटूंची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. कुस्ती या दोघांना कशा प्रकारे एकत्र आणेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वीरूच्या डोळ्यांतले त्याचे स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का आणि त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांना कशा प्रकारे पाहायला मिळेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे. मालिका १९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
                 
  मालिकेची मूळ कहाणी ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करते आहे. तिचे नाव प्राजक्ता चव्हाण आहे. आजवर तिने कुस्तीच्या विश्वात चांगले नाव कमविले आहे. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
आता मालिकेतील  व्यक्तिरेखेबरोबरच कुस्ती  जोपासणारी प्राजक्ता पाहायला मिळणार आहे. वीरूच्या भूमिकेत आपल्याला संकेत चिकटगावकर हा गुणी अभिनेता पाहायला मिळणार आहे. संकेत हा मूळच्या औरंगाबादजवळील वैजापूर इथला आहे. हे दोन्ही नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड या निर्मिती संस्थेने ह्या मालिकेची निर्मिती केली जात आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची ही पहिली दैनंदिन मालिका असणार आहे. ‘तुजं माजं सपान’ या मालिकेचं चित्रीकरण नाशिक येथे करण्यात येते आहे.
                        सोनी मराठी वाहिनी नेहमी आशयघन विषय घेऊन येते ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. या नव्या जोडीचे सामायिक ध्येय आणि स्वप्न काय असेल आणि त्यांची स्वप्नपूर्ती कशा प्रकारे  होईल, हे या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळेल. वीरू आणि प्राजक्ता यांच्या या अनोख्या कहाणीची सुरुवात कशा प्रकारे होते आहे, हे आपल्याला १९ जूनपासून पाहता येणार आहे, आपल्या आवडत्या सोनी मराठी वाहिनीवर.
नवी मालिका – ‘तुजं माजं सपान’. १९ जूनपासून, सोम. ते शनि.,
संध्या. ७ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago