पाटबंधारे विभागाच्या दोन महिला
अभियंता लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता आणि मेरीच्या कार्यकारी अभियंता महिलांनी एक लाख चाळीस हजारांची लाच मागीतली असता त्यापैकी 62 हजारांची लाच घेताना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभाागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पाटबंधारे विभागाच्या प्रथम वर्ग सहायक अभियंता श्रीमती रुबिया मोहम्मद हनिफ शेख आणि मेरीच्या कार्यकारी अभियंता श्रीमती रजनी पाटील, रा.603,हरी आमंत्रण, दत्त मंदिर रोड,नाशिक रोड अशा लाचखोर अधिकारी महिलांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील उंबरे,ता.राहुरी येथील पूर्ण झालेल्या कामाचे देयक 7 लाख 75 हजार 963 रुपये अदा केले म्हणून या कामाच्या अदा केलेल्या बिलापोटी श्रीमती शेख यांनी स्वतः साठी 8 टक्के प्रमाणे व रजनी पाटील यांच्यासाठी 10 टक्के असे एकूण 18 टक्के प्रमाणे 1 लाख 39 हजार पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला असता 62 हजार रुपये लाच स्वीकारताना रुबिया शेख यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर श्रीमती रजनी पाटील यांनी लाच घेण्यास दुजोरा दिला म्हणून त्यांच्याविरुद्ध नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. सापळा अधिकारी उपअधीक्षक प्रवीण लोखंडे,हायक सापळा अधिकारी शरद गोर्डे, अंमलदार रवींद्र निमसे,बाबासाहेब कराड,किशोर लाडमहिला पोलीस अंमलदार राधा खेमनर,सना सय्यद. पोलीस अंमलदार हरून शेख यांच्या पथकाने ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, माधव रेड्डी, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…