नाशिक : जमिनीच्या सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्या चितेगाव ता. निफाड येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांची आत्याने त्यांचे वडील तसेच तक्रारदार यांच्या नावे मौजे नागापूर, ता. निफाड येथे येथील गट क्रमांक 337 अन्वये एक हेक्टर पाच आर अशी शेती मृत्यूपत्र करून लिहून दिलेली होती. याबाबत त्यांनी निफाडच्या दुय्यम निबंधकाकडे दस्त नोंदणी केलेला होता. सातबारा उतार्यावर तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांची नावे लावण्यासाठी तलाठी महेश गायकवाड यांच्याकडे त्यांनी प्रकरण दिले होते. मात्र, तलाठी गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची लाच मागीतली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता आज सापळा रचण्यात आला. त्यात पाच हजार रुपये घेताना तलाठी गायकवाड हे रंगेहाथ सापडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी ही कारवाई केली.
सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…
*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…
सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…