घोटी-सिन्नर महामार्गावर हायवा-कारचा अपघात

घोटी-सिन्नर महामार्गावर हायवा-कारचा अपघात
धामणगांव/वार्ताहर

घोटी सिन्नर महामार्गावर धामणगांव येथे सकाळी १० वाजेच्या दरम्यान साई-सर्विस स्टेशनच्या समोर ईको गाडी क्रमांक एम.एच-१५ एच.एम.२६५७ व समृद्धी महामार्गाचा हायवा क्रमांक एम.एच-४१ ए. यु-९००१ यांची समोरासमोर धडक होऊन गाडी चालक मधुकर बांडे हे जखमी झाले. गाडीमध्ये असलेले गणेश पाटील,शांती पाटील, अनिकेत पाटील हे सर्व रा.भिवंडी व मिराबाई बनकर, नारायण बांडे व लक्ष्मीबाई बनकर राहणार भरवीर खुर्द येथील असून त्यांना स्थानिकानी एस.एम.बी.टी ॲम्बुलन्स च्या मदतीने जवळच असलेल्या एस.एम.बी.टी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाहन चालक मधुकर बांडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून नशीब बलवत्तर म्हणून  इको गाडीत असलेले इतर प्रवासी सुखरूप  असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली व अपघाताची माहिती स्थानिकांनी घोटी पोलीस स्टेशनला दिली.

घोटी सिन्नर महामार्गावर  रात्री व दिवसा समृद्धी महामार्गाचे ये-जा करणाऱ्या वाहने सगळे नियम डावलून वाहतूक करत असतात,असे अनेक अपघातदेखील झालेले असून संबंधित समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाने त्यांच्या वेग मर्यादेवर निर्बंध बसविणे गरजेचे आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago