घोटी-सिन्नर महामार्गावर हायवा-कारचा अपघात
धामणगांव/वार्ताहर
घोटी सिन्नर महामार्गावर धामणगांव येथे सकाळी १० वाजेच्या दरम्यान साई-सर्विस स्टेशनच्या समोर ईको गाडी क्रमांक एम.एच-१५ एच.एम.२६५७ व समृद्धी महामार्गाचा हायवा क्रमांक एम.एच-४१ ए. यु-९००१ यांची समोरासमोर धडक होऊन गाडी चालक मधुकर बांडे हे जखमी झाले. गाडीमध्ये असलेले गणेश पाटील,शांती पाटील, अनिकेत पाटील हे सर्व रा.भिवंडी व मिराबाई बनकर, नारायण बांडे व लक्ष्मीबाई बनकर राहणार भरवीर खुर्द येथील असून त्यांना स्थानिकानी एस.एम.बी.टी ॲम्बुलन्स च्या मदतीने जवळच असलेल्या एस.एम.बी.टी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाहन चालक मधुकर बांडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून नशीब बलवत्तर म्हणून इको गाडीत असलेले इतर प्रवासी सुखरूप असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली व अपघाताची माहिती स्थानिकांनी घोटी पोलीस स्टेशनला दिली.
घोटी सिन्नर महामार्गावर रात्री व दिवसा समृद्धी महामार्गाचे ये-जा करणाऱ्या वाहने सगळे नियम डावलून वाहतूक करत असतात,असे अनेक अपघातदेखील झालेले असून संबंधित समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाने त्यांच्या वेग मर्यादेवर निर्बंध बसविणे गरजेचे आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…