उत्तर महाराष्ट्र

पाच हजाराची लाच घेताना चितेगावचा तलाठी जाळ्यात

नाशिक : जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्‍या चितेगाव ता. निफाड येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांची आत्याने त्यांचे वडील तसेच तक्रारदार यांच्या नावे मौजे नागापूर, ता. निफाड येथे येथील गट क्रमांक 337 अन्वये एक हेक्टर पाच आर अशी शेती मृत्यूपत्र करून लिहून दिलेली होती. याबाबत त्यांनी निफाडच्या दुय्यम निबंधकाकडे दस्त नोंदणी केलेला होता. सातबारा उतार्‍यावर तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांची नावे लावण्यासाठी तलाठी महेश गायकवाड यांच्याकडे त्यांनी प्रकरण दिले होते. मात्र, तलाठी गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची लाच मागीतली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता आज सापळा रचण्यात आला. त्यात पाच हजार रुपये घेताना तलाठी गायकवाड हे रंगेहाथ सापडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी ही कारवाई केली.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

28 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

36 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

42 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

47 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

53 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

1 hour ago