इंदिरानगर | वार्ताहर | कलानगर मार्गे वडाळा गावाकडे जाताना चार चाकी वाहनाला वाचवताना एच पी गॅस ने भरलेला टँकर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर दुभाजकावर जाऊन आढळला. सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, एचपी गॅस ने भरलेला टँकर क्रमांक MH 31 FC 3796 दिनांक 12 रोजी दुपारी शंभर फुटी रस्त्याने कलानगर सिग्नल कडून वडाळा गावाकडे जात होता. एक चार चाकी वाहन गॅस टँकरच्या डाव्या बाजूने गॅस टँकरला अगदी खेटून जात असल्यामुळे गॅस टँकर चालकाचा टँकर वरील ताबा सुटला. त्यामुळे भरलेला गॅस टँकर दुभाजकावर जाऊन आदळला. सुदैवाने टँकर पलटी झाला नाही. असे घडले असते तर गॅस गळती होऊन प्रचंडी हाणी झाली असती. सुदैवाने कुठलीही मोठी जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरचा पंचनामा केला. सदर गॅस टँकर सिन्नर कडे रवाना झाला.