धर्मशाळेत अडकलेल्या 65 वृद्धांची सुखरुप सुटका

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात गेल्या चार दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे ’तसेच धरण क्षेत्रात वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नदी किनारी लोकाना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेची शाळा क्रमांक सोळा आणि गाडगे महाराज धर्मशाळा येथील 65 वृद्धांना तपोवन मध्ये हलविण्यात आले. पालिकेच्या अग्नीशमन विभागाने हे मदत कार्य केले.
याशिवाय पुढील तीन दिवस म्हणजे (दि. 14) नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिला. पालिकेने यापुर्वी धोकादायक घरांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच काही नागरिकांना हलविण्यात देखील आले. पुढच्या काही दिवसात पुराचा धोका असल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार येत्या तीन दिवसात महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *