नाशिक शहर

चारचाकी वाहनाला वाचवताना टँकर दुभाजकावर आदळला

इंदिरानगर | वार्ताहर | कलानगर मार्गे वडाळा गावाकडे जाताना चार चाकी वाहनाला  वाचवताना एच पी गॅस ने भरलेला  टँकर  चालकाचा ताबा सुटल्याने  टँकर दुभाजकावर जाऊन आढळला. सुदैवाने कोणतीही  हाणी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, एचपी गॅस ने   भरलेला  टँकर क्रमांक MH 31 FC 3796   दिनांक 12 रोजी  दुपारी  शंभर फुटी रस्त्याने कलानगर सिग्नल कडून वडाळा गावाकडे   जात होता. एक चार चाकी वाहन गॅस टँकरच्या डाव्या बाजूने  गॅस टँकरला अगदी  खेटून जात असल्यामुळे गॅस टँकर चालकाचा  टँकर वरील ताबा सुटला. त्यामुळे  भरलेला गॅस टँकर दुभाजकावर जाऊन आदळला.  सुदैवाने टँकर पलटी झाला नाही. असे घडले असते तर गॅस गळती होऊन प्रचंडी हाणी झाली असती.  सुदैवाने कुठलीही मोठी जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  टँकरचा पंचनामा केला. सदर गॅस  टँकर सिन्नर कडे रवाना झाला.
Bhagwat Udavant

Recent Posts

श्रमिकनगरला टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या

नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…

22 hours ago

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

2 days ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

4 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

4 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

4 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

5 days ago