कांदा विक्रीसाठी जात असताना ट्रॅक्टर खाली दाबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
लासलगाव प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथील शेतकरी ट्रॅक्टर मधून कांदे विकण्यासाठी लासलगाव बाजार समिती मध्ये घेऊन जात असताना झालेल्या अपघातात स्वतःच्याच ट्रॅक्टर खाली दाबल्याने सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथील शेतकरी अजय नाना उगले (३०) हे
ट्रॅक्टर मधून कांदे विकण्यासाठी लासलगाव बाजार समिती मध्ये घेऊन जात असताना मनमाड लासलगाव रोडवरील चांदवड तालुक्यातील रायपूर शिवारात खड्डे चुकविताना त्यांचा अपघात झाला या अपघातात शेतकरी
अजय नाना उगले हे स्वतःच्याच ट्रॅक्टर खाली दाबल्याने त्यांचा मृत्यू झाला
अजय उगले हे प्रथम कांदा विक्रीसाठी मनमाड बाजार समितीच्या आवारात गेले होते मात्र त्या ठिकाणी कांद्याला कमी दर मिळाल्याने त्यांनी वाडीलांशी चर्चा करून लासलगाव बाजार समितीत जादा भाव मिळेल या अपेक्षेने लासलगाव बाजार समितीत कांदे विक्रीला घेऊन जात असताना दुपारच्या वेळी रायपूर शिवारात खड्डा चुकवतांना हातातून स्टेरिंग सुटल्याने ते खाली पडून ते ट्रॅक्टरचे खाली दाबले गेल्याचे प्रत्यक्षद्शींनी सांगितल्याची माहिती मिळत आहे.अजयच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार असून मनमाड बाजार समितीचे कर्मचारी नानासाहेब राजाराम उगले यांचे ते चिरंजीव होत