नाशिक

मालेगाव- मनमाड रस्त्यावर अपघात; 4 ठार, 20 जखमी

ट्रॅव्हल्स-पिकअपची समोरासमोर धडक

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव- मनमाड महामार्गावर सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास वर्‍हाणे शिवारात भीषण अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्स बस आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना मालेगाव येथील रुग्णालयांत दाखल केले आहे.
अधिक माहिती अशी की, खासगी ट्रॅव्हल्स बस (एमपी 70, झेडसी 7799) पुण्याहून मालेगावकडे येत होती. याचवेळी मालेगावहून मनमाडकडे जाणारे पिकअप वाहन (एमएच12-जेएफ 7422) वर्‍हाणे गावाजवळ समोरासमोर येऊन धडकले. धडकइतकी भीषण होती की पिकअप थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले. अपघातावेळी ट्रॅव्हल्समधील बहुतांश प्रवासी झोपेत होते. अचानक झालेल्या धक्क्याने आणि मोठ्या आवाजामुळे बसमध्ये गोंधळ उडाला. या अपघातात पिकअपमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅव्हल्समधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मालेगाव येथील शेख अताऊर रहेमान शेख आबिद (39, रा. इस्लामपुरा),सत्तार खान मोहम्मद खान (39, रा. प्लॉट नं. 4, अमनपुरा) आणि याकुब शेरू खान (27, रा. अमनपुरा) यांचा समावेश आहे. ट्रॅव्हल्समधील मृत 26 वर्षीय तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मालेगाव तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते शफिक अँटीकरप्शन, आरिफ खान, एस. के. खालीद, रुग्णवाहिका चालक गोरख शेवाळे तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिकअपमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. या अपघातात ट्रॅव्हल्समधील 18 प्रवासी जखमी झाले असून, पिकअपमधील दोन जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी मालेगाव येथील विविध रुग्णालयांत दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी तपास करीत आहेत.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago