वावी जवळ अपघातात मायलेक ठार
इनोव्हाची मोटारसायकलला धडक
सिन्नर: प्रतिनिधी
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील फुलेनगर फाट्याजवळील पेट्रोल पंपावर दुचाकीला इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने माय लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फुलेनगर फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरून दोघे फुलेनगरकडे जाण्यासाठी शर्वरी लॉन्स समोरील रस्ता ओलांडत असतांना सिन्नरवरून शिर्डीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक एम.एच. ०८ ए.एम ३३८३ हिने दुचाकी क्रमांक एम.एच. १५ एच.व्ही ७०८१ हिस जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात वैभव अशोक कुलकर्णी (३८) व सुवर्णा कुलकर्णी (७०) रा. पंचवटी या मायलेकाचा मृत्यू झाला असून त्यांचे मूळ गाव वावी असल्याचे समजते. तसेच या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.दशरथ मोरे व नितीन जगताप करत आहे
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…