नाशिकरोड : प्रतिनिधी
वडनेर दुमाला येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बिटको हॉस्पिटलमधील सिस्टर कोतवाल यांनी उपनगर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 8 एप्रिलला रात्री आठच्या सुमारास सत्यभामाबाई निवृत्ती लांडगे (65, चिंतोळे बंगला, आंबेवाडी, देवळाली कॅम्प) या त्यांच्या मुलासोबत ॲक्टिव्हा दुचाकीवरून वडनेर दुमाला येथून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सत्यभामाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मुलाने त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासले असता त्यांचा मृत्यू झालेला होता
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…