वाहनाच्या धडकेने वृध्देचा मृत्यू 

नाशिकरोड : प्रतिनिधी

वडनेर दुमाला येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बिटको हॉस्पिटलमधील सिस्टर कोतवाल यांनी उपनगर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 8 एप्रिलला रात्री आठच्या सुमारास सत्यभामाबाई निवृत्ती लांडगे (65, चिंतोळे बंगला, आंबेवाडी, देवळाली कॅम्प) या त्यांच्या मुलासोबत ॲक्टिव्हा दुचाकीवरून वडनेर दुमाला येथून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सत्यभामाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मुलाने त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासले असता त्यांचा मृत्यू झालेला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *