नाशिक

खडक माळेगाव येथील जवानाचा अपघाती मृत्यू

 

लासलगाव:समीर पठाण

भारतीय सैन्य दलात राजस्थान येथे सेवेत असलेले खडक माळेगाव चे सुपुत्र योगेश सुखदेव शिंदे यांचे शुक्रवारी अपघाती निधन झाले.आज शनिवारी खडक माळेगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या बाबत मिळालेल्या माहितीनुसार योगेश सुखदेव शिंदे हे पोळा सणा निमित सुट्टी घेऊन खडक माळेगाव येथे घरी आले होते.पोळ्याचा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते काही कामानिमित्त मोटारसायकल वरून वनसगाव रस्त्यावरून जात असताना त्याच वेळी समोरून येणाऱ्या पीक अपगाडी व त्यांच्या मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन योगेश सुखदेव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी देवळाली कॅम्प येथील आर्मी सेंटर येथे पाठविण्यात आला होता.

देवळाली कॅम्प येथून योगेश सुखदेव शिंदे यांचे पार्थिव देह आज शनिवारी दुपारी खडक माळेगाव येथे आणल्यानंतर त्यांच्यावर दुपारी चार वाजता शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.योगेश सुखदेव शिंदे यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,भाऊ,भावजई असा परिवार आहे.या घटनेमुळे परिसरात गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago