सिडको ः विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाणे हद्दीत प्रवासादरम्यान चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने व ऑटोरिक्षासह एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत अंबड पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फिर्यादी वसंत हरी चौधरी (वय 66, रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) यांनी दि. 4 जून 2025 रोजी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रवासादरम्यान त्यांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार होती. त्या अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासा दरम्यान गुन्हे शोध पथकाला जगझाप मळा रोड, मखमलाबाद रोड परिसरात एक इसम चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार आसल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून सुनिल जगन्नाथ कुमावत (वय 47, रा. कुमावत नगर, नाशिक) याला ताब्यात घेतले.
विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली यावेळी पोलिसांनी 8लाख रुपये किंमतीचे 8 तोळे सोन्याचे दागिने आणि 50हजार रुपये किंमतीची 1 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली या कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षक . नितीन फुलपगारे, पोहवा किरण गायकवाड, पोशि सचिन करंजे, अनिल गाढवे, मयुर पवार, तुषार मते, राकेश पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकाने मोलाचे योगदान दिले.याप्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अतुल बनतोडे करीत आहेत.
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…