नाशिक

उंबरमाळी येथे कुजलेल्या अवस्थेत आढळले तीन मृतदेह

शहापूर ः प्रतिनिधी
मुंबई-नाशिक महामार्गाच्या कडेला झाडाझुडपांत एक कार आढळून आली. या कारमध्ये तीन जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
एका महिलेने ही कार पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. अशा अवस्थेतील मृतदेह आढळल्याने शहापूरमधील उंबरमाळी गावानजीक ही धक्कादायक घटना समोर आली. ही कार अपघातग्रस्त असून, झाडाझुडपांत पडली होती. गुरांना चारण्या साठी गेली असता महिलेला ही कार दिसली आणि तिने कारमध्ये डोकावून पाहिले असता तिला त्यामध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसले. हा अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहापूरमध्ये एका अपघातग्रस्त कारमध्ये तिघांच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले. गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या निदर्शनास आली. जशी जशी ही महिला कारच्या दिशेने जवळ गेली तसे तिला त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आली. त्यानंतर या महिलेने कारमध्ये डोकावून पाहिले तर तिला तिघांचे मृतदेह दिसून आले. या महिलेने गावातील नागरिकांना याची माहिती दिली. गावकर्‍यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शहापूर तालुक्यातील उंबरमाळी येथे मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणार्‍या महामार्गावर ही कार नाल्यातील झाडाझुडपांत पडलेल्या अवस्थेत आढळून आली. या कारला चार ते पाच दिवसांपूर्वी अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काल दुपारनंतर उंबरमाळी येथे राहणारे एक महिला गुरे चालण्यासाठी गेली होती. गुरे चालत असतानाच तिचे लक्ष झाडाझुडपात पडलेल्या कारकडे गेले. तिने जवळ जाऊन बघितले तर या कारमध्ये दुर्गंधी येत होती.
या कारची माहिती घेतली असता ती मुंबईतील अंधेरीतील असल्याचे कळले. अधिक तपास केला असता या कारमध्ये यज्ञेश वाघेला सह अन्य दोघांचे मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या तिघांचे अंदाजे वय 25 ते 30 वर्षे असल्याचे समजते. तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago