सातपूर : प्रतिनिधी
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आणि टवाळखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्व हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सातपूर भागात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवत 35 जणांवर कारवाई करण्यात आली.
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सायंकाळी झाडाझडती घेण्यात आली. सातपूर, स्वारबाबानगर, श्रमिकनगर भागात असलेल्या झोपडपट्टीत ही मोहीम राबविण्यात आली. सातपूरच्या प्रबुद्धनगर, श्रमिकनगर आदी वेगवेगळ्या भागात अचानकपणे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सातपूर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईत रेकॉर्डवरील संशयित आरोपींची तपासणी करणे, संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई करणे, टवाळखोरांवर कारवाई, फरारी आरोपींचा शोध घेण्यासह बेकायदा शस्त्र बाळगणार्या व्यक्तींवर कारवाया करण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला न घाबरता सातपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी केले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…