सिडको : वार्ताहर
शासनाने प्लॅस्टिक वापरावर बंदी घातलेली असतानाही सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याने मनपाने कडक पाऊले उचलीत सिडकोत विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू केली आहे . यावेळी अनेक व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला . मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आदेशित केल्याप्रमाणे संचालक , घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ . आवेश पलोड आणि विभागीय अधिकारी डॉ . मयूर पाटील यांच्या सूचनेप्रमाणे नवीन नाशिक विभागामध्ये प्रतिबंधित प्लॅस्टिक विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे . ही मोहीम विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे .
हेही वाचा : विनातिकीट प्रवाशांविरूद्ध रेल्वे प्रशासनाची विशेष मोहीम
मागील आठ दिवसांपासून नवीन नाशिकमधील व्यापारी वर्ग व नागरिकांविरुद्ध प्रतिबंधित प्लॅस्टिक त्यामध्ये सिंगल यूज व ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरल्याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे . या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक बी . आर . बागूल , आर . डी . मते , राजेश बोरीसा , दीपक बोडके , रावसाहेब रूपवते , जितेंद्र परमार तसेच स्वच्छता मुकादम विजय गोगलिया , राहुल गायकवाड , विशाल आवारे , अजय खुळगे ,दीपक लांडगे ,अशोक दोंदे,राजाराम गायकर ,विजय जाधव ,सुनिल राठोड,अजय सौदागर यांचे पथक कामगिरी बजावत आहे.
10 हजारांचा दंड वसूल
महापालिकेची विशेष मोहीम
… अशी असेल कारवाई
प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर करू नये . अन्यथा नागरिक व व्यावसायिकांना या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे .
प्रथम गुन्हा र.रु. ५,००० / –
दंड दुसरा गुन्हा : – र.रु. १०,००० / –
दंड तिसरा गुन्हा : – र.रु. २५,००० / – दंड व ३ महिने कारावास
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…