मुंबई:
बॉलिवूड अभिनेत सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोराने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील नागरिकांना आरडाओरड सुरु केली. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोराने पकडले जाण्याच्या भीतीने त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. या गोंधळात चोराने पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…