महाराष्ट्र

अभिनेत्री डॉ.जुई जवादे यांचे ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपटातून पदार्पण

भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि  ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.या चित्रपटात डॉ.जुई जवादे ही नवोदित अभिनेत्री पदार्पण करत आहे. शरद पवार डेंटल कॉलेज, सावंगी येथून डॉ.जुई यांनी बीडीएस केलं असून व्हीएसपीएम डेंटल कॉलेज, नागपूर येथे इंटरशीप केले आहे. त्यानंतर त्यांनी दोन अनुभवी दंतचिकित्सकांच्या क्लिनिकमध्ये वर्षभर प्रॅक्टिस केली आहे. “Wizards of Waverly Place”, “Hannah Montana” सारखे डिस्ने शो लहानपणी बघायला त्यांना आवडायचे. त्यातूनच अभिनय, डान्स, गाणी याने डॉ. जुई यांच्या मनावर खोल परिणाम केला. रोज आरशासमोर सगळं बघून त्या अभिनयाची तालीम करायला लागल्या. या दरम्यान त्यांना ‘नैना’ नावाचं स्क्रिप्ट मिळालं.त्यात नकारात्मक भूमिका होती म्हणून त्यांनी आधी या चित्रपटाला नकार दिला कारण त्यावेळी त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. पण कुटुंबाने समजावलं “एकदा तरी प्रयत्न कर!” मग त्यांनी छोटासा सराव सुरू केला, आणि डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर अभिनय  सुरू केला.तेथूनच त्यांचा अभिनय प्रवास सुरु झाला.त्यानंतर त्यांना ‘२६ नोव्हेंबर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळाली.
  डॉ.जुई यांनी अगोदर “The Legit Talks” हा टॉक शो २०२१ पासून केला आहे.त्यांचे “The Legit” हे मॅगझिन देखील कार्यरत आहे. तसेच हेल्थ आणि फिटनेस ट्रेनर  म्हणून त्या गेल्या ४ वर्षांपासून कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्या तरुणांना टॉक शो च्या माध्यमातून योग्य संधी शोधून देण्याचं मार्गदर्शन करत आहेत. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट आहे.केवळ चित्रपट नसून,ही एक चळवळ आहे. या चित्रपटात डॉ.जुई यांच्यासोबत अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉ. विलास उजवणे आणि अंजली उजवणे यांसारखे प्रतिभावान कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल,असे दिसते.या चित्रपटात डॉ.जुई यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. संविधान दिन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा, हाच उद्देश घेऊन निर्मिती झालेला हा सिनेमा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी उभा राहिलेला एक प्रेरणादायी आवाज आहे.येत्या मे मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Editorial Team

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

17 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

17 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

17 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago