मुंबई :
छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेबसिरीजमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचे मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी निधन झाले. ती अवघ्या 38 वर्षांची होती. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला होता.
प्रिया मराठे ही मध्यंतरी कर्करोगातून बरीही झाली होती. तिने यानंतर परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. प्रिया मराठे हिचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाणे, महाराष्ट्र येथे झाला. ती 38 वर्षांची होती. मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचे बालपण घडले. अकरावीमध्ये शिकत असताना प्रियाला महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली. अभिनयातील वाढते आकर्षण त्यांनी करिअर म्हणून स्वीकारले.2005 साली ’या सुखांनो या’ या मराठी मालिकेमधून प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. विशेषतः तिच्या निगेटिव्ह भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या प्रवासाची सुरुवात ’कसम से’ या मालिकेतील ’विद्या बाली’ या भूमिकेपासून झाली. मराठी इतिहासावर आधारित ’स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत त्यांनी ’गोदावरी’ची भूमिका अतिशय समरसून साकारली. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील ’मोनिका’या भूमिकेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…