अॅक्युपंक्चर असाध्य ते साध्य !

 

अॅक्युपंक्चर ही चिनी पद्धत असून, अॅक्स म्हणजे सुई व पंक्चर म्हणजे टोचणे. शरीराच्या विशिष्ट बिंदूवर जर सुईने टोचले तर त्या बिंदूची व्याप्ती वाढून शरीरातील व्याधी बरा होतो.

अॅक्युपंक्चर ही भारतातील प्राचीन उपचारपद्धती होती. पण ती पूर्वी भारतात प्रचलित न झाल्यामुळे या पद्धतीचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे लोकांना या पद्धतीने बरेच तोकडे ज्ञान असून, ही पद्धत भारतात उशिरा पण लवकरात लवकर प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ही पद्धत अतिशय परिणामकारक असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या पद्धतीस मान्यता दिली आहे.

या पद्धतीत साधारणातः ब्रान्कायटीस, अस्थमा, अॅसिडिटी, पोटदुखी, कंबरदुखी, गतिमंद, टाचदुखी, फिट येणे, पार्किन्सन स्पोंडिलोसिस, डोकेदुखी, सायटिक, पोलिओ, अर्धांगवायू, मानसिक दुर्बलता, लैंगिक दुर्बलता, स्त्रीरोग, लकवा, बहिरेपणा, मुकेपणा, संधिवात, मणक्याचे विकार, गुडघेदुखी, सर्दी, मधुमेहामुळे आलेली कमजोरी, लठ्ठपणा इ. व्याधीवर यशस्वीरीत्या उपचार केला जातो. तसेच आहे. आजच्या युगात सर्वाधिक महत्त्व असलेल्या त्वचाविकारांवर रामवाण इलाज म्हणून कॉस्मॅटिक अॅक्यु. खूप प्रचलित आहे. अशा प्रकारे नवीन वा जुनाट रोगापासून अॅक्यु. द्वारे रोग्याची मुक्तता केली जाते.

पूर्वीपासून आपल्याकडे शरीराला मालिश करण्याची पद्धत आहे. मसाज केल्यानंतर त्या बिंदूवर दाब पडून शरीराच्या प्रत्येक अंगात प्राण संचार होतो. त्यामुळे मानवाला सुखद अनुभव येतो. कान टोचणे, नाक टोचणे, डाग देणे, नस धरणे, स्त्रियांनी कुंकू लावणे, बांगड्या, पैंजण, जोडवे घालणे हे पूर्वीपासून आपले पूर्वज करत आले आहेत. यामुळे विशिष्ट बिंदूचे अॅक्युप्रेशर होते. म्हणून पूर्वीच्या काळी रोगराई, आजारी पडण्याचे प्रमाण आजच्या तुलनेत कमी होते. लोकांची रोगप्रतिकारशक्ती ही चांगली होती.

सध्याच्या काळात मॉडर्न फॅशनमुळे आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. म्हणून सर्वत्र रोगराई, आजारांचे प्रमाण वाढले आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळेही आजारांचे प्रमाण वाढले.

 

अशा परिस्थितीमध्ये विविध आजारांसाठी अॅक्युपंक्चर ही नैसर्गिक सुरक्षित उपचार पद्धतीचा प्रचार व प्रसार डॉ. ए. आर. गिते, डॉ. लता गिते दौंड ( दरमहा दि. ११ ते १५ ) राळेगणसिद्धी दरमहा दि. १६ ते २०) व डॉ. संतोषी पाटील, नाशिक (दरमहा दि. २६ ते ५० (९४०३५१६५९४) येथे भव्य शिबिर घेत आहे.

 

अॅक्युप्रेशर ही क्रिया होऊन अॅक्युपंक्चर उपचारासोबतच डॉ. संतोषी पाटील खालील उपचार पद्धतीचा वापर करतात.

⚫ Scalp Acupuncture – आपल्या मस्तकावरील विशिष्ट बिंदूवर acu उपचार केले जातात.

⚫ Auriculo therapy आपला कान हा पूर्ण मानवी शरीराला दर्शवितो. बहुतांश आजारांसाठी कानाच्या विशिष्ट बिंदूवर उपचार केला जातो.

⚫’Cosmetic Acu. आजच्या युगात सुंदरता हा खुप महत्त्वाचा विषय बनला आहे. अॅक्ने, बटरफ्लाय पिगमेटिशन, व्हिटिलिगो अॅलोपेसिया ( टक्कल पडणे), लठ्ठपणा, चेहऱ्यावरील सुरकुत्या, सोरायसिस एक्झीमा व इतर त्वचा विकार यासाठी cosmetic acu. ही नैसर्गिक व बहुगुणी उपचार पध्दती आहेत.

⚫ Acupressure शरीराच्या ठराविक बिंदुवर बोटाने किंवा अनुकुचिवार नसलेल्या वस्तुने दाब देणे म्हणजे अॅक्युप्रेशर, अॅक्युप्रेशर हा उपचार आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीही करू शकतो.

⚫Cupping गुडघेदुखी मणकेदुखी, मानेचे विकार अशा आजारांवर Cupping ही उपयुक्त अशी उपचार पध्दती आहे. यामध्ये शरीराच्या विशिष्ट भागावर cup लावून suction केले जाते. त्यामुळे तेथील भागाचे रक्ताभिसरण सुधारते व शरीरातील energy flow होण्यास मदत होते.

⚫moxibustion यामध्ये moxa नावाच्या वनस्पतीने शरीराच्या विशिष्ट बिंदुला शेक दिला जातो.

⚫plum Blossom therapy यामध्ये ७ स्टार नीडला वापरून alopecia सारखे रोग बरे केले जातात.

⚫कॅटगट/प्रेस सुई निडल/सीड एम्बेडिंग/ मॅग्नेट थेरपी *पॉइंट इंजेक्शन थेरपी

⚫”मेरिडियन मसाज क्रायो पंक्चर

अशा या किफायतशिर व बहुगुणी उपचार पध्दतीने आत्तापर्यंत सोलापूर, सातारा, सांगली. शिर्डी, संगमनेर, सिध्दटेक, राशिन, भिगवन, कोल्हापुर, दमण, फलटण, बारामती, इ. विविध ठिकाणी रुग्णांसाठी शिविर आयोजित केली गेली आहेत.

या पध्दतीत महिन्यातून १० दिवस रोज ४० मिनिटे याप्रमाणे उपचार केले जातात. आजार जितका जूना तितका कालावधी जास्त लागतो. डॉ. संतोषी अॅक्युपंक्चर सोबत वरील टेक्नीकचा उपयोग करत रुग्णावर उपचार करतात. त्याचा रुग्णांवर नवीन व जुनाट व्याधींसाठी खूप परिणामकारक फायदा झाल्याने दिसून येते.

 

-डाॅ.संतोषी गिते -पाटील
B.A.M.S.P.G.D.E.M.S.

Ashvini Pande

Recent Posts

पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे… नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…

3 hours ago

एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन

एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…

12 hours ago

गौतमी पाटील आता गाजवणार छोटा पडदा

गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…

12 hours ago

राज्यपालांची जागा राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. देशात राष्ट्रपती घटनाप्रमुख असतात, तर राज्यांत तेच काम राज्यपाल…

12 hours ago

अभिनेत्री डॉ.जुई जवादे यांचे ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपटातून पदार्पण

 भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि  ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…

12 hours ago

गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू

दिंडोरी  : प्रतिनिधी  दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…

12 hours ago