नाशिक

दुभाजकातील जाहिरातींत वीस फुटाचे अंतर ठेवा

नाशिक : प्रतिनिधी
दिलेल्या नियमाप्रमाणे शहरातील काही प्रायोजक जाहिरात न लावता अगदी दोन-दोन फुटावर जाहिराती लावून शहर परिसर विद्रुप करीत आहे. दरम्यान याप्रकरणी पालिका आयुक्तांनी कडक शब्दात इशारा देत प्रत्येकांनी नियमांची अमलबजावणी करुन वीस फुटाचे अंतर सोडून या जाहिराती लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिलेल्या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रायोजकाविरोधात थेट कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
आयुक्तांनी नाशिक शहराची जबाबदारी घेतल्यापासून त्यांनी शहराच्या सौंदर्यकरणावर पहिल्या दिवसापासूनच विशेष भर दिलेला आहे. त्यानुसारच शहरातील वाहतूक बेटे, विविध चौक यांचे सुशोभीकरण केले जात आहे. चौकांचे सुशोभीकरण करतांना त्यात एकसारखेपणा असावा. प्रत्यक्षात तो तसा दिसावा असे आयुक्तांचे प्रयत्न आहे. रविवार कारंजा, लेले हॉस्पिटल, गजपंथ, गोविंदनगर, कॅनडा कॉर्नर, मंगल कार्यालय,अशोक स्तंभ, मुंबई नाका, अमरधाम रोड, रेलवेस्थानक परिसर, शालीमार चौक, पंपिंग स्टेशन, अर्पणरक्तपेढी, रविवार कारंजा,
सीबीएस, शालिमार येथील इंदिरा गांधी चौकाचे सुशोभीकरण सुरू झाले आहे.त्याच प्रमाणे रस्तयांचे दुभाजकही आकर्षक होत आहे. असे असतांना काही व्यक्ती विद्रुपीकरण करत असतील तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहर धार्मिक नगरी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.वर्षभर जगभरातील भाविक नाशिकला येतात. बारावर्षांनी कुंभमेळा भरतो. विभागीय अधिकारी,विविध कर विभाग तसेच बांधकाम विभागाने शहरातील विविध रस्त्यांची पाहणी करायची आहे. या पहणीत मोठे रस्ते आढळले िआण त्या ठिकाणी फुटपाथ होवू शकणार असेल तर अशा जागा त्वरीत शोधून त्या ठिकाणी पुढील कार्यवाही करर्‍याच्या सुचनाही आयुक्तांनी दिल्या.त्र्यंबकनाका ते गडकरी चौकापर्यंत काम करणार्‍या प्रायोजकांनी जिाहराती 20 फुटावर लावयला हव्या होत्या. परंतु सदर प्रायोजकांनी 5 फुटावर जिाहराती लावल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्या ऐवजी विद्रुपीकरण होत आहे.
सदर प्रायोजकाला समज द्या. ऐकले तर बरेच. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करा अशा सुचना आयुक्तांनी दिल्या. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी शहरातील 132 चौकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक दायित्व निधीतून चौकांचे सुशोभीकरण होवू लागले आहे. चौकांचा लूक बदलत असून रस्ता दुभाजकांना आकर्षक पणा येत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

20 hours ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

3 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

3 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

3 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

5 days ago